पंतप्रधान पिकविमा नुकसान भरपाई योजने अंतर्गत मुक्ताईनगर, बोदवड,रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी 2023-24 च्या खरिप हंगामातील पिकांचा पिक विमा काढला होता. मागील वर्षी या तालुक्यात पावसाचा खंड पडून दुष्काळ निर्माण झाला होता त्यामुळे शेतकरी विमा नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरले होते. परंतु शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होत होता. शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असुन 2023 च्या खरिप हंगामातील पिक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बोदवड तालुका अध्यक्ष प्रशांत आबा पाटिल यांनी माहिती दिली.
बोदवड, मुक्ताईनगर ,रावेर तालुक्यातील महसुल मंडळात काही ठिकाणी पावसाचा खंड, तर काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला होता यामुळे या तालुक्यातील शेतकरी खरिप हंगाम 2023 चा पिकविमा नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरले होते. जळगाव जिल्ह्याला खरिप हंगाम 2023-24 साठी शासना तर्फे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती परंतु राज्य शासनाने आपल्या हिस्स्याची रक्कम विमा कंपनी कडे वर्ग न केल्याने शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई ची रक्कम मिळण्यास विलंब होत होता हि बाब लक्षात घेऊन आ एकनाथराव खडसे, रविंद्र भैय्यासाहेब पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिणी खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष्याच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चे ,आंदोलन, निवेदनाच्या माध्यमातून पिक विम्याची रक्कम मिळण्या बाबत शासनाकडे सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता.
बोदवड तालुक्यात सरसकट नुकसान झालेले असून सुद्धा विमा कंपनी टाळाटाळ करत होती त्यासाठी रोहिणी खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली मि तालुका अध्यक्ष आबा पाटिल आणि माझे सहकारी सतिष पाटिल ,निलेश पाटिल यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या नागपूर येथिल क्षेत्रीय कार्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीच्या तक्रार नोंदणी पासून नुकसानीच्या प्रत्येक टप्प्यात बोदवड तालुका सर्व भरपाई निकषात बसतो अशी बाजू मांडून सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली जावी हे कंपनीच्या निदर्शनास आणून दिले होते.
शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होत होता राज्य शासनाने त्यांच्या हिस्स्याची रक्कम भरावी आणि शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई ची रक्कम वितरित करण्यात यावी यासाठी रोहिणी खडसे यांनी जिल्हाधिकारी, कृषी मंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असुन राज्य शासनाने त्यांच्या हिस्स्याची रक्कम विमा कंपनीकडे वर्ग केली असुन शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यात बोदवड तालुक्यातील 12 हजार 959 शेतकऱ्यांना 17 कोटी 84 लाख, मुक्ताईनगर तालुक्यातील 2 लाख शेतकऱ्यांना 9 लाख 51 हजार, रावेर तालुक्यातील 890 शेतकऱ्यांना 50 लाख अशी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यासाठी बोदवड तहसीलदार कृषी विभाग, आणि इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी यांचे सहकार्य लाभले.
तसेच चालू खरिप हंगाम 2024 मध्ये सुद्धा अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले असुन या खरिप हंगामाची सुद्धा शेतकरी बांधवाना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आम्ही पाठपुरावा करत असल्याचे सतिष पाटिल यांनी सांगितले. यावेळी बाजार समिती उपसभापती ज्ञानेश्वर पाटिल,रामदास पाटिल, सतिष पाटिल, निलेश पाटिल उपस्थित होते
पंतप्रधान पिक विमा योजने अंतर्गत खरिप 2023 हंगामात मुक्ताईनगर मतदारसंघातील शेतकरी बांधव पिक विमा नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरले होते शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी सतत पाठपुरावा केला त्याला यश आले असुन शेतकरी बांधवांच्या खात्यात पिक विमानुकसान भरपाई ची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे काही अडचण आल्यास शेतकरी बांधवानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यां सोबत संपर्क साधावा चालु खरिप हंगामात झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळण्याची आम्ही प्रयत्नशील आहोत