crop insuranc list: मागील वर्षी खरीप हंगाम २०२२ मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान झाले होते. जिल्ह्यातील १० लाख ५७ हजार ५०८ शेतकऱ्यांनी सहा लाख ५१ हजार ४२२ हेक्टर क्षेत्रावर पीकविमा उतरविला होता.crop insuranc list
यात अधिसूचनेनुसार ३६६ कोटी ५० लाख रुपये व स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसान या घटकांतर्गत १०६ कोटी, असे
एकूण ४७२ कोटी ५१ लाख रुपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी दिली.
नांदेडला प्रधानमंत्री पीकविमा योजना युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत राबविली जाते. शेतकऱ्यांना नुकसानीच्या २५
टक्के आगाऊ रक्कम मिळावी यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सोयाबीन, खरीप ज्वारी, कापूस व तूर पिकांसाठी मिड
सीझन डायव्हर्सिटीची अधिसूचना लागू केली होती. crop insuranc list
या अधिसूचनेनुसार विमा कंपनीने ३६६ कोटी ५० लाख रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. याचबरोबर पीकविमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसान या घटकांतर्गत प्राप्त पूर्वसूचनांचे पंचनामे करून तिसऱ्या हप्त्यात अनुक्रमे ९९ कोटी ६५ लाख रुपये व ६ कोटी ३६ लाख रुपये रक्कम वाटप करण्यात आली आहे. सन २०२२-२०२३ मध्ये विविध घटकांतर्गत एकूण ४७२ कोटी ५१ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहेत.
७५ टक्के भरपाईची वेगळी तरतूद नाही
पीक कापणी प्रयोगानुसार उंबरठा उत्पादनावर आधारित पीकविमा ज्या महसूल मंडलांना लागू होईल अशा सर्व संबंधित शेतकऱ्यांना जी रक्कम वाढीव मिळेल ती यानंतर जमा करण्यात येते.या व्यतिरिक्त ७५ टक्के नुकसान भरपाई अशी कुठल्याही प्रकारची वेगळी तरतूद पीकविमा योजनेत नाही. शेतकऱ्यांनी चुकीच्या संदेशाला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.