शेत जमीन विकत घेताना या गोष्टीची काळजी घ्या, फसवणुकी पासून वाचा.

आपण बऱ्याचदा ऐकले की वाचले असेल की शेत जमीन विकत घेताना कोणाची तरी कसल्या पद्धतीने तरी फसवणूक झालेली असते. अशा प्रकरणांमध्ये जास्त करून एकच जमीन एका पेक्षा जास्त जणांना विकणे,तसेच जमीन कोणाच्या मालकीची असते व दुसराच व्यक्ती त्याची विक्री करतो या प्रकारचे अनेक फसवणुकीचे प्रकार आपल्याला घडताना दिसून येतात.

त्यामुळे लाखो रुपये देऊन जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार करताना आपण गोष्टींची कसोशीने काळजी घेणे खूप गरजेचे असते. नाहीतर लाखो रुपये जाऊन उगाचच मानसिक त्रासाला आपल्याला सामोरे जावे लागू शकते व पुढे चालून अनेक कायदेशीर प्रक्रियेच्या जाचात देखील आपण अडकू शकतो. त्यामुळे या लेखात आपण छोट्या परंतु काही महत्त्वाच्या गोष्टी बघणार आहोत त्यांची तुम्हाला जमीन खरेदी विक्री व्यवहारांमध्ये फायद्याच्या ठरतील.

1- सातबारा उतारा व्यवस्थित तपासणे– सातबारा उताऱ्याला जमिनीचा आरसा म्हटला जातो व त्यामुळे सातबारा उतारा हा जमीन खरेदी विक्री व्यवहारामध्ये खूप महत्त्वाचा दस्तऐवज ठरतो. तुम्हाला ज्या ठिकाणी जमीन खरेदी करायची आहे त्या जमिनीचा सातबारा तुम्ही आता ऑनलाईन पद्धतीने काढू शकतात व त्यावरील फेरफार आणि 8 अ उतारे व्यवस्थित तपासून घ्यावेत.

सातबारा वरील नावे ही विक्री करणाऱ्या व्यक्तींचीच आहेत का हे देखील तपासून घ्यावेत. 7/12 उताऱ्यावर जर मृत व्यक्ती किंवा इतर कोणाची नावे असल्यास ते काढून टाकण्यास सांगावेत.

तसेच इतर अधिकारांमध्ये जमिनीवर कोणत्याही बँकेचे कर्ज नाही ना याची खात्री करून घ्यावी तसेच काही वर्षांपूर्वीचे जमिनीचे कागदपत्रे सुद्धा तपासून घ्याव्यात. याबाबत जमिनीचे फेरफार उतारे तपासून तुम्हाला जमिनीच्या मालकी विषयीची संपूर्ण माहिती मिळते.

2- जमिनीचा नकाशा पाहणे आपण जी जमीन खरेदी करत आहोत ती जमीन कुठून कुठे पर्यंत आहे हे चेक करण्यासाठी तुम्ही जमिनीचा नकाशा पाहू शकतात. तुम्हाला ज्या गटातील शेत जमीन खरेदी करायची आहे त्या गटाचा नकाशा पाहणे गरजेचे असते

व नकाशात दाखवल्याप्रमाणे जमीन आहे की नाही हे देखील तपासून घ्यावी. तसेच त्या जमिनीच्या चतु:सीमा म्हणजेच चारही बाजूंना कोणत्या गट नंबरची शेती आहे याची देखील तुम्हाला माहिती मिळून जाते.

3- शेतरस्त्याची माहिती घ्यावी शेत जमिनीसाठी रस्ता असणे खूप गरजेचे असते व त्यामुळे कुठलीही जमीन खरेदी करताना जमिनीत जाण्या येण्यासाठी शेतरस्ता आहे की नाही हे पाहून घेणे महत्त्वाचे ठरते.

बऱ्याचदा जमिनींना रस्ता नसतो व दुसऱ्याच्या शेतातून रस्ता केल्यामुळे कायदेशीर समस्या निर्माण होऊन वाद होतो. त्यामुळे जमिनीचा व्यवहार करण्याअगोदर या सर्व गोष्टींची खात्री करून घेणे आवश्यक आहे. शेत जमीन विकत घेताना

5- जमिनीची भूधारणा पद्धत तपासणे जमीन खरेदी करायची आहे ती कोणत्या भूधारणा पद्धती अंतर्गत येते ते बघून घ्यावे. सातबारा उताऱ्यावर भूधारणा पद्धतीचे नोंद केलेली असते. यामध्ये जर भोगवटादार वर्ग एक पद्धत असेल तर अशा जमिनींचे हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात व शेतकरी या जमिनीचा मालक असतो.

अशा प्रकारची जमीन खरेदी विक्री करताना कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. परंतु सातबारावर भोगवटादार वर्ग दोन असे नमूद केले असेल तर मात्र अशा जमिनीचे हस्तांतर करण्यावर शासनाचे निर्बंध आहेत. शेत जमीन विकत घेताना

यामध्ये शासनाच्या परवानगीशिवाय जमिनीचे हस्तांतर होत नसल्यामुळे या गोष्टी तपासून घ्याव्यात. भोगवटादार वर्ग 2 जमिनीमध्ये प्रामुख्याने देवस्थान इनाम जमिनी आणि शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनीचा समावेश होतो.

Leave a Comment