Crop Insurance loan पीक विमा नवीन यादी: पीक विमा, ज्याला कृषी विमा म्हणून देखील ओळखले जाते, हे एक जोखीम व्यवस्थापन साधन आहे जे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, कीटक किंवा कृषी उत्पादनावर परिणाम करणाऱ्या इतर अनपेक्षित घटनांमुळे पिकांच्या नुकसानीपासून संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. हे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीसाठी आर्थिक भरपाई प्रदान करते, त्यांना अशा नुकसानीच्या आर्थिक परिणामातून सावरण्यास मदत करते.
डिसेंबर, २०२३ व जानेवारी, २०२४ या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे.
अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. Crop Insurance loan
अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने २ ऐवजी ३ हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे.
अनुदान वितरित केले जाणार आहे. ज्याच्यामध्ये जिरायत क्षेत्रासाठी 13,500 आणि बागायत क्षेत्रासाठी 27 हजार रुपये या दरानुसार दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर पर्यंत अनुदान दिले जाणार आहे
शासन निर्णयः
डिसेंबर, २०२३ व जानेवारी, २०२४ या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भाधीन क्र.४ येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रु.२४६७.३७ लक्ष (अक्षरी रुपये चोविस कोटी सदुसष्ट लक्ष सदतीस हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.