नमस्कार मित्रांनो अतिवृष्टी नुकसान नुकसान भरपाई आता ऑनलाइन पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
राज्यात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते याचा लाभ काही शेतकऱ्यांना मिळाला तर काही शेतकऱ्यांना मिळाला नाही.
आता जे शेतकरी या नुकसान भरपाई पासून वंचित होते आशा शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे.
शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईच्या यद्याचे काम वेगाने चालू असल्याची माहिती तहसीलदार कार्यालयातून मिळाली आहे.
शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित होताच ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना बँक खात्यावर जमा केली जाणार आहे
चला तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया.
नुकसान भरपाई थेट बँक खात्यावर जमा करण्याचे काम सुरू
राज्यात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे जवळपास 72 हजार हेक्टर वरील क्षेत्राचे नैसर्गिक आपत्तिमुळे नुसकान झाले
या नुकसानापोटी शासनाने वाशिम जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी26 कोटी 51 लाख 27 हजार रुपयाची मदत जाहीर केली आहे.
यामुळे आता बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शासन स्तरावरून हा निधी जमा केला जाणार आहे.
वाशिम जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली तर ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना धोका दिला या नैसर्गिक आपत्तिमुळे हजारो हेक्टरवरील खरीप पिकाची वाट लागली.
या पीक नुकसान भरपाईपोटी शासनाने बाधित शेतकऱ्यांना वाढीव भरपाई देण्याची घोषणा केली आहे व तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देखील दिले आहे.
त्यानुसार वाशिम जिल्ह्यात सहा तालुक्यात नुकसांनीचे पंचनामे करण्यात आले आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने नुकसान झालेल्या क्षेत्राचा अहवाल शासनाकडे पाठवला आहे.
या अहवालानुसार शासनाने अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत मंजूर केली आहे परंतु ही मदत आता जिल्हा पातळी एवजी शासन स्त्रावरूनच शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
यद्यांचे काम वेगाने झाले सुरू
अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने निधी मंजूर केला आहे या निधीचे वितरण शासन स्तरावरून करण्यात येणार आहे.
त्यासाठी शासनाने ऑनलाइन कार्यपद्धती कार्यान्वित केली असून बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यासाह नावाची यादी शासनाला पाठवण्यात येणार आहे.
त्यामुळे या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम तहसीलदार स्तरावर युद्ध पातळीवर सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
शासनाने असा केला निधी मंजूर
सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्यासाठी 26 कोटी 51 लाख 26 हजार रुपयाचा निधी मंजूर झाला आहे
त्यासोबत ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी शासनाने 32 कोटी 77 लाख 31 हजार रुपयाचा निधी मंजूर केला आहे.