शेतकऱ्यांची दिवाळी गोड! आज एकाच दिवशी पिएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे मिळणार 4 हजार रुपये

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. कारण, आज शेतकऱ्यांच्या खात्यात पिएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे एकूण 4 हजार रुपये जमा होणार आहेत. केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा (PM Kisan Yojana) 18वा हप्ता आणि महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा (Namo Shetkari Yojana) पाचवा हप्ता आज शेतकऱ्यांच्या (Agriculture Schemes) खात्यात जमा होणार आहे.

केंद्र आणि राज्य सरकारची ही संयुक्त भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशिम येथे होणाऱ्या कार्यक्रमात या दोन्ही योजनांचे लाभ हस्तांतरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित राहणार आहेत

किती शेतकऱ्यांना मिळणार आहे हा लाभ?

राज्यातील सुमारे 91.53 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. याचा अर्थ, प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात 4 हजार रुपये जमा होतील. यामध्ये केंद्र सरकारच्या योजनेचे 2 हजार रुपये आणि राज्य सरकारच्या योजनेचे 2 हजार रुपये असे आहे.

केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान योजना

पंतप्रधान किसान सन्मान योजना ही केंद्र सरकारची एक महत्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. हे पैसे तीन समान हफ्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात.

महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महासन्मान योजना

महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गतही शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते.

कसे तपासायचे की तुमच्या खात्यात पैसे आले आहेत का?

तुम्ही तुमच्या बँकेच्या नेट बँकिंग किंवा मोबाइल बँकिंग अॅपच्या माध्यमातून तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही हे तपासू शकता. तसेच तुम्ही तुमच्या बँकेत जाऊनही ही माहिती घेऊ शकता. पिएम किसान आणि नमो शेतकरी

Leave a Comment