Majhi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या नावाची यादी जाहीर करण्यात आली आहे. जर तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असेल आणी अजून तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर लाडकी बहीण योजनेची ही यादी एकदा.
राज्यातील 2 कोटी 30 लाख महिलांच्या बँक खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै ते नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा करण्यात आले आहेत. माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या नावाची नवीन यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ज्या महिलांची नावे असतील त्याच महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत.
त्यामुळेच, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असेल आणी अजून तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नसतील तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ही यादी एकदा चेक करून पाहा.
Majhi Ladki Bahin Yojana : माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या नाव यादी जाहीर करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेची ही यादी डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला गुगलवर तुमच्या शहराच नाव आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्च कराव लागेल. जस की जर तुम्ही धुळे येथे राहात असाल तर, धुळे कॉर्पोरेशन अस सर्च कराव लागेल. धुळे कॉर्पोरेशन सर्च केल्यावर तुम्हाला, मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण – लाभार्थी यादी – Dhule अस दिसेल. तुम्हाला हे पेज ओपन करायच आहे आणी त्यानंतर डाऊनलोड पर्यायावर क्लिक करून तुम्ही ही यादी डाउनलोड करू शकता.
वरीलप्रमाणे तुम्ही तुमच्या जिल्ह्याची माझी लाडकी बहीण योजनेची यादी डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या महानगरपालिकेच्या वेबसाईटवर ही यादी मिळाली नाही तर जिल्हाधिकाऱ्यांच्या वेबसाईटवरून तुम्ही ती डाउनलोड करू शकता. तुम्हाला तिथूनही यादी डाउनलोड करता आली नाही तर तुमच्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांना लाभार्थी यादीबद्दल किंवा पैशांबद्दल विचारू शकता. Majhi Ladki Bahin Yojana