ग्रामीण भागात मध्य रात्री ड्रोनच्या घिरट्या नागरिक धास्तावले, काय आहे सत्य पहा सविस्तर ? drone news

drone news : जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात रात्री ड्रोनचा मुक्त संचार होत असल्याने नागरीकांमधे भितीचे वातावरण आहे. ड्रोन बाबत उलट सुलट चर्चा होत असतांनाच दुसरीकडे पोलिस यंत्रणेकडुन रात्री घिरट्या घालणाऱ्या ड्रोनवर कारवाई होत नसल्याने ड्रोनच्या घिरट्याचे गुढ वाढले आहे.

जालना जिल्ह्यात सर्व प्रथम अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी परिसरात रात्री आकाशात ड्रोन घिरट्या घालतांना दिसु लागले होते. त्यानंतर वडीगोद्री, शहागड परिसरात रात्री ड्रोन फिरतांना दिसुन आले. याबाबत गोंदी पोलिसांनी ड्रोन मालकांची बैठक घेउन त्यांना सुचना दिल्या होत्या. त्यानंतर भोकरदन तालुक्यातील ग्रामीण भागात रात्री ड्रोन फिरत असल्याच्या तक्रारी नागरीकांतुन ऐकावयास मिळत आहेत. drone news

रात्री घिरट्या घालणारे ड्रोन कोणाचे? व घिरट्या घालण्याचे कारण काय? असा प्रश्न नागरीकांना पडला आहे. ड्रोनबाबत ग्रामीण भागात उलट सुलट चर्चा होत असल्याने पोलिस प्रशासनाने ड्रोनचा मुद्दा गंभीरतेने घेणे गरजेचे आहे.

अद्याप हे ड्रोन कोणाकडून उडवले जात आहे त्या संदर्भात कोणतीही मुद्देशीर बातमी मिळाली नाही.

बाहेरील बातम्यानुसार हे ड्रोन लष्करी चाचणी करण्यासाठी उडवले जात असल्याचे समोर येत आहे व ड्रोन कंपन्या या चाचण्या घेत असल्याचे सांगण्यात येत आहे

त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जात सर्तक राहावे.

Leave a Comment