अतिवृष्टी आणि दुष्काळ होणार खात्यात जमा ऑनलाईन पद्धतीने स्टेटस बघा

शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे बरेच शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि दुष्काळ अनुदान मिळणार आहे हे अनुदान काही शेतकऱ्यांना मिळाले आहे व काही शेतकऱ्यांना मिळणार आहे दुष्काळ होणार खात्यात जमा.

तुम्हालाही अनुदान मिळाले का या अनुदानाची रक्कम मिळाली का? हे तुम्ही आता ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईलवर सुद्धा तपासू शकता.

या अंतर्गत ही रक्कम किती मिळणार व कशा पद्धतीने मिळणार ही संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. दुष्काळाच्या अनुदान किती आलेले आहे व अतिवृष्टीचे अनुदान किती आलेले आहे हे बघण्यासाठी शासनातर्फे एक नवीन पोर्टल निर्माण करण्यात आलेली आहे या पोर्टल द्वारे आता तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवर एकदम सोप्या पद्धतीने हे तपासू शकता की किती रक्कम मिळाली आहे.

दुष्काळ होणार खात्यात जमा अशा पद्धतीने बघा ऑनलाईन स्टेटस

ऑनलाइन पद्धतीने स्टेटस तपासण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सर्वात पहिले शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल या संकेतस्थळावर जाण्यासाठी खालील बटणावरती टच करा.

अधिकृत वेबसाईट

वरील बटनावर क्लिक करतात तुमच्यासमोर एक वेबसाईट ओपन होईल ही वेबसाईट शासनाची वेबसाईट आहे व अधिकृत वेबसाईट आहे.

वेबसाईट ओपन झाल्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी vk नंबर टाकायचा आहे.

Vk नंबर टाकने आवश्यक आहे जर तुमच्याकडे विकी vk नंबर नसेल तर हा नंबर मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या तलाठी कार्यालयामध्ये भेट द्यावी लागेल.

हा vk नंबर टाकून या ठिकाणी तुम्हाला सबमिट या बटणावरती क्लिक करायचे आहे.

आता तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती दाखवण्यात येईल जसे की Account Holder Name.

Account Number.

Date.

Bank Name.

Amount in RS.

Payment Status.

अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी ही संपूर्ण माहिती दाखवून देणार आहे जसे की या माहितीमध्ये तुम्हाला अकाउंट होल्डर नेम म्हणजे खातेधारकाचे नाव.

यानंतर अकाउंट नंबर म्हणजेच जे अकाउंट नंबर वर हे पैसे जमा करण्यात आलेले आहे तो अकाउंट नंबर कोणत्या तारखेला हे पैसे जमा करण्यात आले आहे ती तारीख कोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा करण्यात आले आहे त्या बँकेचे नाव ही रक्कम किती आहे रुपयांमध्ये ही संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी एकदम योग्य पद्धतीने दाखवण्यात येणार आहे.

या ठिकाणी तुम्हाला शेवटी दोन पर्याय बघायला मिळणार आहे जशी की पेमेंट स्टेटस आणि रिमार्क.

रिमार्क मध्ये जर हे काही अडचण दाखवत असेल तर या ठिकाणी तुमचे काही बँकचा किंवा दुसरा प्रॉब्लेम असू शकतो यामुळे तुमचे हे पेमेंट जमा होण्याची कमी शक्यता आहे.

या कारणामुळे जर तुमची पेमेंट जमा होत नसेल तर तुम्ही तुमच्या बँकेकडे भेट देऊन ते बघू शकता की यामध्ये काही समस्या आहे का.

जर काही अडचण असेल तर हे तुम्हाला रिमार्क मध्ये सुद्धा दाखवण्यात येईल आणि जे तुमचे पेमेंट ऑप्शन आहे त्यामध्ये हे fail किंवा unsuccessful दाखवण्यात येईल.

अशा पद्धतीने तुम्ही अगदी काही मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलवर तुमच्या दुष्काळाचे अतिवृष्टीचे व इतर अनुदान बघू शकता.

अतिवृष्टी आणि दुष्काळ होणार खात्यात जमा

Leave a Comment