राज्य सरकारनं अवकाळी व अतिवृष्टी नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी २० सप्टेंबर रोजी तीन शासन निर्णय प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये एकूण १८ जिल्ह्यांसाठी अवकाळी व अतिवृष्टी मदत निधी देण्यात येणार आहे. यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपुर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, गोंदिया, लातूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा यामध्ये समावेश आहे.
जून ते ऑगस्ट २०२४ अतिवृष्टी
जून ते ऑगस्ट २०२४ दरम्यान अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांसाठी २३ कोटी ७२ लाख ९३ हजार रुपयांच्या निधीला मंजूर देण्यात आली आहे. त्याचं वाटप गोंदिया, पुणे, लातूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. या मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर डीबीटी पोर्टलवरून जमा करण्याचे निर्देशही राज्य सरकारनं दिले आहेत.
विशेष म्हणजे यासाठी १ जानेवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार जिरायत, बागायत आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या नवीन दरानं जास्तीत जास्त ३ हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात यावी, असा उल्लेख शासन निर्णयात करण्यात आला आहे. ३ हेक्टर ऐवजी २ हेक्टरची मदत तेही जुन्या दरानुसार मिळाल्यानं बहुतांश शेतकऱ्यांनी यापूर्वीही तक्रार केली होती. यामध्ये नागपूर विभागासाठी ८ कोटी, पुणे विभागासाठी २ कोटी, छत्रपती संभाजीनगर विभागासाठी ३ कोटी, नाशिक विभागासाठी ७ कोटी आणि कोकण विभागासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
मार्च ते मे २०२४ अवकाळी
राज्य सरकारने मार्च ते मे २०२४ च्या कालावधीत चंद्रपुर, पुणे, सातारा, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात अवकाळी आणि अतिवृष्टी झाली होती. त्यामुळं शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालं होतं. त्यामुळं या पाच जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ४४ कोटी ७४ लाख २५ हजार रुपये निधी वितरणास मंजूरी देण्यात आली आहे. यामध्ये नागपूर विभागासाठी २ कोटी, पुणे विभागासाठी पुणे विभागासाठी ४२ कोटी रुपयांची मदत निधी मंजूर केली आहे.
या मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर डीबीटी पोर्टलवरून जमा करण्याचे निर्देशही राज्य सरकारनं दिले आहेत. विशेष म्हणजे यासाठीही १ जानेवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार जिरायत, बागायत आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या नवीन दरानं जास्तीत जास्त ३ हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात यावी, असा उल्लेख शासन निर्णयात करण्यात आला आहे.
फेब्रुवारी २०२४ मध्ये बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातील अवकाळी
फेब्रुवारी २०२४ मध्ये बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या अवकाळीचा आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. या शासन निर्णयानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ५ कोटी २२ लाख १३ हजार रुपयांच्या निधीला मंजूरी देण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५ कोटी ५ लाख ७ हजार तर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळं सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार, असं चिन्हं दिसू लागली आहेत.
अवकाळी आणि अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांना देण्यात न आल्यानं पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी धारेवर धरलं होतं. त्यावेळी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी जसजसे नुकसानग्रस्त जिल्ह्यातील पिकांचे पंचनामे पूर्ण होतील आणि जसजसे विभागीय आयुक्तांकडून अधिकच्या निधीचे प्रस्ताव प्राप्त होतील, तसतशी मदत निधीचं वाटप करण्यात येईल, असं सांगितलं होतं. राज्य सरकारला विभागीय आयुक्तांनी नुकसानग्रस्त पिकांची मदत देण्यासाठी जास्तीच्या निधीचे प्रस्ताव पाठवले होते. त्यानुसार आत्ताची मदत देण्यात येत आहे.
ऑगस्ट सप्टेंबर २०२४ च्या अतिवृष्टि मदतीची प्रतीक्षा
मराठवाडा आणि विदर्भातील विविध जिल्ह्यात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबर पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीनं धुमाकूळ घातला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नुकसानग्रस्त भागाची केली होती. त्यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं असल्याची ग्वाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिली होती. तर शेतकऱ्यांना तातडीने मदत निधी देण्याचं आश्वासन कृषिमंत्री मुंडे यांनी दिलं होतं. त्यामुळं मदत मिळेल, अशी शेतकरी आशा धरून आहेत. पण अजून तरी ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीची मदत देण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही.
यादी पहा
- यवतमाळ,
- बुलढाणा,
- चंद्रपुर,
- पुणे,
- सातारा,
- सोलापूर,
- सांगली,
- गोंदिया,
- लातूर,
- नाशिक,
- धुळे,
- नंदुरबार,
- जळगाव,
- अहमदनगर,
- ठाणे,
- रायगड,
- रत्नागिरी
- सिंधुदुर्ग
या जिल्ह्याचा यामध्ये समावेश आहे.